नगर- न्यू इंग्लिश स्कूल (आताचे रुपीबाई बोरा विद्यालय)च्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती गीता गोपाळ पुंड (टेकाडेबाई) यांचे नुकतेच वृद्...
नगर- न्यू इंग्लिश स्कूल (आताचे रुपीबाई बोरा विद्यालय)च्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती गीता गोपाळ पुंड (टेकाडेबाई) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
कै.गीता पुंड यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये 38 वर्षे सेवा केली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.










