पारनेर : पारनेरमधील युवकांनी उभारलेले महावीर जैन स्थानक प्रेरणास्थळ बनणार असून, यातून धार्मिक जागरूकता वाढणार असल्याचे प्रतिपादन प. पू....
पारनेर : पारनेरमधील युवकांनी उभारलेले महावीर जैन स्थानक प्रेरणास्थळ बनणार असून, यातून धार्मिक जागरूकता वाढणार असल्याचे प्रतिपादन प. पू. प्रीतीसुधाजी म. सा. यांनी केले.
पारनेर शहरातील जैन युवकांनी लोकवर्गणीतून उभारलेल्या महावीर जैन स्थानकाचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत होते. प. पू. प्रीतीसुधाजी म. सा. म्हणाल्या, जैन समाजात धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. भगवान महावीर, आनंदऋषिजी महाराज यांनी दिलेल्या तत्त्वांवर उपासनेच्या मार्गावर सर्वांनी दैनंदिन जीवनात अवलंब करावा. पारनेर शहरात जैन धर्मियांसाठी युवकांनी उभारलेले महावीर जैन स्थानक प्रेरणादायी होईल.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले, पारनेर शहरात युवकांनी लोकवर्गणीतून महावीर जैनस्थानक उभारले. हा युवकांचा आदर्श समाजासमोर दीपस्तंभासारखा आहे. खिंवसरा कुटुंबीयांनी जागा दिली हे दातृत्व मोठे आहे. यावेळी जैन समाजाच्या महावीर जैन स्थानकासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी यांनी दिले. जैन स्थानकासाठी मध्यवस्तीत जागा देणारे हरकचंद खिंवसरा, कांतीलाल खिंवसरा, कुंदनमल खिंवसरा, अमित बोरा यांचा गौरव करण्यात आला .
यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी, नगराध्यक्षा सीमा औटी, सभापती नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, शशिकला शेरकर, जैन स्थानकाचे अध्यक्ष चंदन भळगट, अशोक कटारिया, प्राचार्य राजकुमार गांधी, संतोष गांधी, चंदन गांधी, अनिल भळगट, कमलेश गांधी, प्रशांत बोरा आदी उपस्थित होते.










