नगर - १८१३ मध्ये स्थापन झालेली स्टेशन रस्त्यावरील ऐतिहासिक संस्था क्लेरा ब्रूस शाळेच्या जागेची बेकायदेशीर विक्री झाली असून या प्रकर...
नगर - १८१३ मध्ये स्थापन झालेली स्टेशन रस्त्यावरील ऐतिहासिक संस्था क्लेरा ब्रूस शाळेच्या जागेची बेकायदेशीर विक्री झाली असून या प्रकरणाची सीआयडी किंवा सीबीआयकडून चौकशी करण्याच्या मागणीसाठी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्यात आले. जागेच्या व्यवहारात बिल्डर माफिया अंडरवर्ल्डचा हात असल्याचा आरोप करत आंदोलकांनी चौकशीची मागणी केली.
आंदोलकांनी दिलेल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मराठी मिशन ही संस्था बंद पाडण्याचे षडयंत्र वायडर चर्च मिनिस्ट्रीजचे तथाकथित विश्वस्त भालचंद्र चक्रनारायण, प्रेम मसिह, युनूसदास प्रधान, फिलिप बार्नबस, बिशप प्रकाश पाटोळे, बिशप अॅन्ड्रयूज राठोड त्यांचे कुलमुखत्यार रॉबर्ट मोजेस यांनी आखले आहे. त्यांनी मराठी मिशनच्या ताब्यातील वापरातील मिळकती बिल्डर माफिया अंडरवर्ल्ड लोकांच्या हस्तकांकडे देण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
मुंबईतील या आंदोलनात अनिल पलघडमल, रेव्हरंड सी. एच. भांबळ, राजू देठे, व्ही. बी. वाघमारे, आर. पी. गायकवाड, रेव्हरंड एम. डी. नाईक, तुषार वाघमारे, डी. पी. पंडित, सुनील जाधव यांच्यासह नगर शहर जिल्ह्यातील अनेक ख्रिस्ती समाजबांधव सहभागी झाले आहेत.










