आर्किटेट, इंजिनअर्स असो.च्या क्रिकेट स्पर्धा संपन्न नगर- धकाधकिच्या जीवनात शरीर सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने वेळ काढून व्यायामा...
आर्किटेट, इंजिनअर्स असो.च्या क्रिकेट स्पर्धा संपन्न
नगर- धकाधकिच्या जीवनात शरीर सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने वेळ काढून व्यायामाबरोबरच मैदानी खेळालाही तेवढेच महत्व द्या, असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी केले.
वाडिया पार्क येथे आर्किटेट, इंजिनइर्स ऍण्ड सर्व्हेअर्स असोशिएशनच्यावतीने अध्यक्षीय संघाविरुद्ध उपाध्यक्षीय संघात क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन आ.जगताप यांचे हस्ते चेंडू टोलावून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महापौर अभिषेक कळमकर उपस्थित होते.
आ.जगताप यांनी यावेळी असोसिएशनने राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. सामाजिक भावनेतून जाणिव ठेवणारे हे आर्किटेट सामाजिक भावनेतून जाणीव ठेवणारे हे आर्किटेट इंजिनइर्स यांचे मोठे योगदान समाजीक क्षेत्रात आहे. स्वत:साठी वेळ काढून अशा स्पर्धा घेऊन एकमेकांचे धैर्य वाढवितात ही आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले. महापौर अभिषेक कळमकर यांनी दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या.









