श्रीगोंदा येथील सुफीसंत शेख महंमद बाबा यांच्या यात्रेनिमित्त साजरा केला जाणारा उत्सव हा सर्व ग्रामस्थांनी जातीभेद विसरुन एकत्र येऊ...
श्रीगोंदा येथील सुफीसंत शेख महंमद बाबा यांच्या यात्रेनिमित्त साजरा केला जाणारा उत्सव हा सर्व ग्रामस्थांनी जातीभेद विसरुन एकत्र येऊन शांततेत व कायद्याचे उल्लंघन न करता करावे असा इशारा अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिला.
दर वर्षी होणाऱ्या यात्रोत्सवेत दंगल व राईट्स पथके दाखल होतात व शहराची बदनामी होते त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन शांततेत व सुव्यवस्थेत तसेच कुठलाही कायदा हातात न घेता शांततेत पार पाडावा असे प्रतिपादन सुफीसंत शेख महंमद बाबा यांच्या योत्रोत्सवानिमित्त आयोजीत शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते म्हणाले. तसेच जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची कुठल्याही प्रकारे गय केली जाणा नाही असा दमवजा समज अतिरिक्त पोलीस अधिक्षक देशमुख यांनी यावेळी बोलतांना दिले.
शांतता समितीच्या बैठकीत तहसिलदार वंदना खरमाळे, भागचंद घोडके, पो.नि.शामकांत सोमवंशी, घनशाम शेलार, बाबासाहेब भोस, बापूसाहेब गोरे, सतिष मखरे आदिंसह यात्रासमितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. देशमुख म्हणाले, की महंमद बाबा हे हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. हा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. हे शहर तुमचे आहे, यात्रा तुमची आहे, देवस्थावर श्रध्दाही तुमचीच आहे मात्र वाद निर्माण होताहेत, वर्तमान पत्रात तसेच मुंबईसारख्या ठिकाणाहून येणाऱ्या पडसादही चांगले नाहीत. याची दखल सर्वांनी घ्यावी असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.










