जिवा सेना संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी माऊली गायकवाड यांची फेरनिवड नगर- जिल्ह्यात जिवा सेना संघटनेच्या माध्यमातून असंख्य प्रश्न मार्...
जिवा सेना संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी माऊली गायकवाड यांची फेरनिवड
नगर- जिल्ह्यात जिवा सेना संघटनेच्या माध्यमातून असंख्य प्रश्न मार्गी लागवे. नगर जिल्हा जिवासेना संपर्क कार्यालयाचे पाइपलाइन रोड, श्रीरामचौक येथे नवीन जागेत उद्घाटन संपन्न झाले. पहिल्याच वर्षी जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले माऊली गायकवाड यांनी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी संघटना मजबुत करीत आता जिल्ह्यात या संघटनेचे काम अधिकाधिक विस्तारासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती संत चरण रज छगन महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. या उद्घाटनानंतर कार्यालयातच निवडी जाहिर करण्यात आल्या. यावेळी जिवा सेनेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख अशेाक राऊत, प्रा.मंगेश वाघमारे, विशाल सैंदाणे, बाप्पु सोन्नीस, दिलीप गायकवाड, मुरलीधर मगर आदि मान्यवर उपस्थित होते.
ह.भ.प. छगन महाराज यांचे हस्ते नगर जिल्हा जिवा सेना जिल्हाध्यक्ष पदी माऊली गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली तसे पत्र सर्व नवीन निवड झालेल्या पदाधिकार्यांना देण्यात आले. नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष इश्वर वाघमारे( दक्षिण), प्रभाकर कदम (उत्तर), कार्याध्यक्ष संजय शिंदे (पश्चिम), रमेश बिडवे (पुर्व), जिल्हा सचीव योगेश पिंपळे, संघटक आबा हिरे, युवा संघटक सुनिल पवार, जिल्हा युवा अध्यक्ष कांतीलाल कोकाटे, जिल्हा युवा उपाध्यक्ष आशिष ताकपीरे, कायदेशीर सल्लागार ऍड.मनोज जायभाय तसेच मार्गदर्शक म्हणून विश्वनाथ यादव, शहाजी कदम, दिलीप औटी, प्रा.सुनिल पंडीत, प्रा.मंगेश वाघमारे, मधुकर राऊत आदिंची निवड जाहीर करुन सर्वांना निवडीचे पत्रे देण्यात आली.
यावेळी सुरेश मदने, शरद दळवी, अशोक औटी, श्रीपाद वाघमारे, संदीप सोनवणे, सुशील थोरात, गणेश खंडागळे, संतोष गायकवाड, अमोल कदम, पप्पू मोरे, वैभव वाघमारे, सुनिल पवार, संदीप घुले, सचीन वारे, मल्हारी गीते, अक्षय कलंके तसेच असंख्य जिवा सेना संघटनेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









