Archive Pages Design$type=blogging

अहमदनगर जिल्ह्यात मिळणार आता स्वस्त औषधे

अहमदनगर - जागतिक पातळीवर भारतामध्ये निर्माण होणाऱ्या औषधाची निर्मिती व निर्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे औषधनिर्मिती मधून मोठ्या...



अहमदनगर - जागतिक पातळीवर भारतामध्ये निर्माण होणाऱ्या औषधाची निर्मिती व निर्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे औषधनिर्मिती मधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. भारतामधुन 70 टक्के औषधे जगभरात निर्य़ात होतात. पण ती सध्या भारतातील सामान्य जनतेला उपलब्ध होत नाहीत. सर्व जेनेरिक औषधे विक्रीपूर्वी सर्व गुणवत्ता नियंत्रण, चाचण्या, अन्न व औषधे प्रशासन विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना प्रमाणित असतात. अन्न व औषधे विभागाने सर्व डॉक्टरांना औषधांच्या ब्रॅंडेड नावासोबत त्या औषधातील रसायनाचे नांव (कंटेन) पण लिहिण्याचे आदेश दिलेले आहेत. अन्न, वस्त्र व निवाऱ्याबरोबरच आरोग्याचा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे. 

आर्थिकदृष्ट्या संपन्न लोक तितकेच जागृत व सर्वश्रेष्ठ वैद्यकीय सेवेचा उपभोग घेऊन आपल्या आऱोग्याची काळजी घेत असतात. त्यासाठी कितीही पैसा कमीत कमी वेळेत खर्च कऱण्याची त्याची मानसिकता व तयारी असते. याच्या नेमकी उलट परिस्थिती सामान्य व गरीब माणसांची असते. समाजातील या घटकाचे नेमके उलट आहे. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक सामान्य गरीब नागरिकांना उपचाराचा खर्च परवडत नाही. म्हणून औषधे न घेताच रोग आणि काही जीवघेणे आजार सहन करतात. त्यातच अनेकांना अकाली मृत्युला सामोरे जावे लागते.

समाजातील अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मदतीचा हात देण्याचे पंतप्रधान वनऔषधी योजनेमार्फत भारत सरकारने ठरविले आहे. सध्या मध्यप्रदेश तसेच राजस्थान या राज्यांमध्ये सर्व ठिकाणी जेनेरिक औषधांची विक्री तेथील सरकारच्या पुढाकाराने चालू आहे.याचाच एक भाग म्हणून जेनेकिकार्ट मेडिसीन प्रा.लि.या कंपनीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या जेनेरिक औषधाचे स्वस्त दरात रुग्णांना वितरण करण्याची जबाबदारी घेतली आहे.

याचाच एक भाग म्हणून आता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शहरे व गांवे याठिकाणी आम्ही जेनेरिक औषधी सेवा या नावाने सुमारे 60 ते 70 दुकाने मार्च 2016 अखेर सुरु करण्याचे ठरविले आहे. यातील जिल्ह्यातील पहिले संपूर्ण जेनेरिक औषधे विक्री केंद्र आम्ही संगमनेर येथील भारत जेनेरिक औषधी सेवा, माधव पार्वती कॉम्प्लेक्स, लिंक रोड, राज्याचे माजी महसूल मंत्री मा.श्री.बाळासाहेब थोरात व मा.आ.श्री.सुधीरजी तांबे यांचे शुभहस्ते दिनांक 6 मार्च 2016 रोजी सकाळी 10.00 वाजता व अकोले येथील ओम वेदांत जेनेरिक औषधी सेवा, बस स्थानकाचे मागे, पोपेरे हॉस्पिटल शेजारी, मा.आ.श्री.वैभवभाऊ पिचड साहेब यांचे शुभहस्ते दि.6 मार्च 2016 रोजी दु.1.00 वा. सुरु करीत आहोत.

राहाता येथील साई धन्वंतरी जेनेरिक औषधी सेवा, दंडवते टॉवर, नगर-मनमाड रोड, प्रवरा बँकेशेजारी याठिकाणी राज्याचे विरोधी पक्ष नेते मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील, मा.सौ.शालिनीताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांचे शुभहस्ते व श्रीयुत प्रमोदजी कातकाडे, सह.आय़ुक्त, अन्न व औषधी प्रशासन अहमदनगर जिल्हा, श्री.बाजीराव शिंदे साहेब, मुख्य कार्य़कारी अधिकारी, साईबाबा विश्वस्त संस्था, शिर्डी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 7 मार्च 2016 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरु करीत आहोत.

अहमदनगर येथील स्वामीकृपा जेनेरिक औषधी सेवा, कुष्ठधाम रोड, भिस्तबाग चौक, सावेडी, या ठिकाणी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप साहेब यांचे शुभहस्ते दिनांक 11 मार्च 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता सुरु करीत आहोत. तरी या सेवेचा सर्व जनतेने लाभ घ्यावा.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: अहमदनगर जिल्ह्यात मिळणार आता स्वस्त औषधे
अहमदनगर जिल्ह्यात मिळणार आता स्वस्त औषधे
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_64.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_64.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago