नगर - येथील वसुंधरा वुमन्स फाऊंडेशनच्या 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त विविध संघटनांच्या महिला पदाधिकार्यांनी एकत्र येवून महिलांचे ...
नगर - येथील वसुंधरा वुमन्स फाऊंडेशनच्या 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त विविध संघटनांच्या महिला पदाधिकार्यांनी एकत्र येवून महिलांचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने महिला व मुलींकरीता विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
ज्या महिला दिवसभर काबड कष्ट करुन संसाराचा गाडा ओढत आहेत. अशा कष्टकरी महिलांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्याचा अनोखा उपक्रम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राबविण्यात आला. प्रारंभी सरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी फाऊंडेशच्या नुतन अध्यक्षा वंदना पंडित, उपाध्यक्षा गितांजली काळे, गिता गिल्डा, सचिव छाया रजपुत, खजिनदार राजश्री मांढरे, कार्याध्यक्षा माया कोल्हे, सुरेखा विद्ये, कल्पना गांधी, माजी अध्यक्षा निता देवराईकर, सुवर्णा डागा, जया गायकवाड, लतिका पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.









