नगर - विजय ट्रेडिंग कंपनी व फर्निचर वर्ल्डचे चालक विजय नाहर यांचे बंधू व हॉटेल प्रेमदानचे चालक सुनिल नाहर यांच्या पत्नी सौ.सुनिता सुनिल न...
नगर - विजय ट्रेडिंग कंपनी व फर्निचर वर्ल्डचे चालक विजय नाहर यांचे बंधू व हॉटेल प्रेमदानचे चालक सुनिल नाहर यांच्या पत्नी सौ.सुनिता सुनिल नाहर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 50 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्व.सुनिता नाहर यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या अंत्यत मनमिळावू व धार्मिकवृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.










