नगर - सामाजिक भावनेतून नगरसेविका वीणा बोज्जा यांनी मूकबधिर विद्यालयास डिश टीव्ही संच भेट देण्याचा राबविलेला उपक्रम चांगला आहे. डिश टीव्हीच...

नगर - सामाजिक भावनेतून नगरसेविका वीणा बोज्जा यांनी मूकबधिर विद्यालयास डिश टीव्ही संच भेट देण्याचा राबविलेला उपक्रम चांगला आहे. डिश टीव्हीच्या माध्यमातून येथील मुलांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे. कार्यक्रमांबरोबरच मुलांना इतर माहिती त्यामुळे मिळू शकेल. मुलांच्या या माध्यमातून जग आणखी जवळ येऊ शकेल. दूरचित्रवाहिन्या म्हणजे माहितीचा खजिनाच आहेत. मुलांना याचा चांगला उपयोग होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.नगरसेविका वीणा बोज्जा यांच्या वतीने अपंग संजीवनी सोसायटीच्या मूकबधिर विद्यालयास आमदार संग्राम जगताप व महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते डिश टीव्ही संच भेट देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभागृहनेते कुमारसिंह वाकळे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, श्रीनिवास बोज्जा, संभाजी पवार, संस्थेेचे अध्यक्ष मधुकर भावले, संदीप ठोंबरे, बालाजी नंदाल, सौरभ झिंजे उपस्थित होते.महापौर कळमकर म्हणाले की, अपंग संजीवनी सोसायटीच्या मूकबधिर विद्यालयात अनेक मुले-मुली शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या माध्यमातून या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. त्यांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले जाते.









