नगर - विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त व अंतर्गत गुणांना वाव मिळण्यासाठी जागतिक महिला दि...
नगर - विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त व अंतर्गत गुणांना वाव मिळण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेविका सौ.संगीता खरमाळे यांनी भजन स्पर्धेचे आयोजन केले. भजन स्पर्धेचे हे 8 वे वर्ष असून यात एकूण 20 भजनी मंडळांनी सहभाग घेतला. सर्व भजनी मंडळांच्या अध्यक्षांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करण्यात आले.
या स्पर्धेचे आय़ोजन कोहिनूर मंगल कार्यालय येथे प्रभाग क्र. 2, 8 व 11 या प्रभागातील महिलांसाठी करण्यात आले होते. महिलांमध्ये असाणाऱ्या अनेक कलागुणांना वाव मिळण्यासाठी योग्य व्यासपीठाची
गरज असते यामुळे या भजन स्पर्धेचे आय़ोजन करण्यात आले असे प्रतिपादन सौ.संगीता खरमाळे यांनी केले.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - प्रथम क्रमांकः स्वरदायिनी भजनी मंडळ, व्दितीय क्रमांकः सरस्वती भजनी मंडळ, तृतीय क्रमांकः महालक्ष्मी भजनी मंडळ आणि उत्तेजनार्थ सिध्दकला भजनी मंडळ, सखी भजनी मंडळ व रुक्मिणी भजनी मंडळ असे विजेत्या भजनी मंडळांचे नावे आहेत.
परीक्षक म्हणून सौ.संगीता देऊळगांवकर व निशिगंधा डावरे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा होसिंग व वंदना साबळे यांनी केले तर आभार शालिनी कुलकर्णी यांनी मानले.









