श्रीगोंदा - शासनाकडून गतवर्षी प्राप्त झालेले 4500 रुपयांचे पीक अनुदान, तक्रारदार व त्याच्या आईचे नांवे बँकेत जमा करण्यासाठी तक्रारदा...
श्रीगोंदा - शासनाकडून गतवर्षी प्राप्त झालेले 4500 रुपयांचे पीक अनुदान, तक्रारदार व त्याच्या आईचे नांवे बँकेत जमा करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदारासमक्ष 400 रुपयांची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारतांना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक श्री.दिगंबर प्रधान अँटी करप्शन ब्युरो नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिनियम इरफान शेख, पो.नि.विजय मुर्तंडक, पो.नि.चंद्रशेखर सावंत, पो.हे.कॉ. वसंत वाव्हळ आदिंनी दिली.
कामगार कार्यालयाजवळ दलीत वस्तीमध्ये 400 रुपयाची रक्कम स्विकारतांना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. बेलवंडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांने लाच स्विकारल्याची घटना ताजी असतांनाच ही एका महिन्यातच दुसरी घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.










