अहमदनगर - केंद्रीय अर्थसंकल्पातील नवीन कररचनेनुसार दागिने महाग होणार आहेत. ही कररचना सराफांच्या व्यवसायावर घाला घालणारी आहे. त्याम...
अहमदनगर - केंद्रीय अर्थसंकल्पातील नवीन कररचनेनुसार दागिने महाग होणार आहेत. ही कररचना सराफांच्या व्यवसायावर घाला घालणारी आहे. त्यामुळे सराफ संघटनांनी या कररचनेला विरोध करण्यास सुरूवात केली आहे. देशपातळीवर त्यासाठी सराफ संघटनांनी बंद पुकारला आहे.
महाराष्ट्र राज्य सराफ, सुवर्णकार फेडरेशने देखील या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील व शहरातील सराफ व्यवसायिक या बंदमध्ये उद्यापासून (बुधवार) सहभागी होणार असल्याची माहिती राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष सुभाष मुथा यांनी दिली. सराफ व्यवसायिकांचा शुक्रवारपर्यंत हा बंद असणार आहे. सराफांच्या व्यवसायाचे हित न जोपसल्यास देशपातळीवर सराफ व्यवसायिक संघटना जो निर्णय घेईल, त्यानुसार जिल्हा पातळीवर त्याची अंमलबजावणी होईल, असेही मुथा यांनी सांगितले. नगर जिल्ह्यात सुमारे दीड हजारांवर सराफ व्यवसायिक आहेत. अर्थसंकल्पातील नवीन कररचनेनुसार दागिन्यांवर एक टक्के अबकरी कर आदण्यात आला आहे. त्याला सराफांचा विरोध असल्याचे मुथा यांनी सांगितले.










