नगर- येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू मुक्त विद्यापीठने काही अपरिहार्य कारणास्तव शिक्षण अपूर्ण राहिले किंवा जीवनातल्या दैनंदिन जबाबदा...
नगर- येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू मुक्त विद्यापीठने काही अपरिहार्य कारणास्तव शिक्षण अपूर्ण राहिले किंवा जीवनातल्या दैनंदिन जबाबदार्या पार पाडतांना शिक्षणाला वेळ मिळत नसल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून दिले अशा सर्व उर्दू भाषिकांसाठी घर बसल्या आपणास आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. अहमदनगर येथील चॉंद सुलताना हायस्कूल व ज्युनि.कॉलेज येथे या मुक्त विद्यापीठाच्या केंद्राची सुरुवात झालेली आहे.
या विद्यापीठामार्फत पदवीसाठी बी.ए.(जनरल), बी.एस्सी. (मॅथ्य, फिजिक्स), लार्ईफ सायन्स ऍण्ड फिजिकल सायन्स हे कोर्स बारावी उत्तीर्णच्या आधारावर सुरु आहे तर पदव्युत्तरसाठी एम.ए. (उर्दू), एम.ए.(इंग्रजी), एम.ए. (इतिहास) शिक्षण पदवीच्या आधारावर सुरु आहे. यासाठी 10 एप्रिल 2016 पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे.
या विद्यापीठाला महाराष्ट्र शासनाची मान्यता असून, यामध्ये शिक्षण घेणार्या बर्याच विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात एम.ए.,एम.बी.ए., बी.एड्. व एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच युपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षाही दिल्या आहेत. तर प्राथमिक शिक्षकांनी वरिष्ठ श्रेणी मिळविली आहे. सर्व सरकारी व निम सरकारी नोकरीसाठीही हे विद्यार्थी पात्र राहतील.
तरी या संधीचा नगर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी फायदा घ्यावा. अधिक माहितीसाठी 9423167958, 9822372191 या नंबरवर किंवा चॉंद सुलताना हायस्कूल येथे या विद्यापीठाच्या समन्वयकांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










