नागपूर - महाराष्ट्र परिवहन विभागाच्या 23 ऑक्टोबर 2015 च्या परिपत्रकानुसार ऑटोरिक्षा चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी मराठी बोलणे, वाच...
नागपूर - महाराष्ट्र परिवहन विभागाच्या 23 ऑक्टोबर 2015 च्या परिपत्रकानुसार ऑटोरिक्षा चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी मराठी बोलणे, वाचणे, लिहिणे आवश्यक केले होते. या परिपत्रकानुसार 20 आणि 24 फेब्रुवारीस ऑटोरिक्षा परवाना धारकांना परिवहन विभागाने नोटीस काढली होती. या नोटीसप्रमाणे 29 फेब्रुवारी ते 5 मार्च 2016 या कालावधीत मराठी चाचणी होणार होती. अनुत्तीर्ण उमेदवाराचे परवाने वा नुतनीकरण रद्द होणार होते. मात्र विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेराव हे उच्च न्यायालयात गेले.
न्या.भूषण गवई आणि न्या प्रदीप देशमुख यांचे समोर झालेल्या सुनावणीत, न्यायालयाने राज्याचे परिवहन आयुक्त आणि नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नोटीस बजावून नवीन पध्दत काही काळ स्थगित केली आहे. तसेच दोन दिवसांत राज्य सरकारने उत्तर देण्याच िनर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी उद्या 4 मार्च रोजी होणार आहे.










