नगर- हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिकवणीनुसार शिवसैनिक हा सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा अ...
नगर- हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिकवणीनुसार शिवसैनिक हा सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा असला पाहिजे. त्याला मदत करणारा, त्यांच्या संकटाला धावून जाणारा आदि गुण शिवसैनिकात असले पाहिले. त्याने फक्त राजकारण न करता समाजकारणातही आपला वेगळा ठसा निर्माण केला पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन कायनेटिक चौक शिवसेना शाखा व दिपक खैरे मित्र मंडळाच्यावतीने शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक विजय भांगरे यांच्या परिवारास रु. 31 हजार व कामरगांव येथील संदिप साठे या विद्यार्थ्यांच्या किडनी आजारासाठी रु.21 हजारांचा धनादेश शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगरसेवक दिपक खैरे, सोपान कारखिले, सोमनाथ साठे, लक्ष्मण साठे, भास्करराव खांदवे, नितीन मेहेत्रे, सतीश चोपडा आदिंसह शिवसैनिक व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.









