अहमदनगर - जिल्हा प्रशासनाने अनेक वेळा वाळू ऑनलाईन विक्रिसाठी निविदा देऊनही नदीपात्रातील वाळू साठ्यांची विक्री झाली नाही. जिल्ह्याती...
अहमदनगर - जिल्हा प्रशासनाने अनेक वेळा वाळू ऑनलाईन विक्रिसाठी निविदा देऊनही नदीपात्रातील वाळू साठ्यांची विक्री झाली नाही. जिल्ह्यातील 55 वाळू साठे लिलावाविना पडून असल्यामुळे कोट्यावधींचा महसूल बुडला आहे. ही वसुली वाढविण्यासाठी गौण खनिज विभागाने ठेकेदारांकडे मोर्चा वळविला असून सोमवारी बैठक घेऊन प्रशासन त्यांची मनधरणी करणार आहेत. परंतु हा प्रयोग किती यशस्वी होतो हे बैठकीनंतरच समजेल.
जिल्हा प्रशासनाने अनेकदा वाळू साठे विक्रीसाठी काढूनही अवघ्या 9 वाळू साठ्यांचा लिलाव झाला आहे. परंतु योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने कारवार्ईची मोहिम उघडली. तालुका व जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती केली. जिल्हास्तरीय पथकाने नदीपात्रज्ञात छापे टोकले परंतु नदीपात्रात पथक पोहचण्याआधीच वाळूतस्कर पसार झाले. कारवाई होऊनही वाळूतस्कर दाद देत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अजून 55 वाळू साठे हे लिलावाविना तसेच पडून आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. वसुली वाढविण्यासाठी गौण खनिज विबागाने जिल्ह्यातील नोंदणीकृत ठेकेदारांकडे मोर्चा वळविला आहे. त्यांच्यासाठी नव्याने ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
त्यापुर्वी त्यांची सोमवारी बैठक घेण्यात येत आहे. बैठकीची माहिती नोंदणीकृत ठेकेदारांना देण्यात आली असून, सोमवारी होणाऱ्या बैठकीत किती ठेकेदार वाळू लिलाव घेण्यास इच्छुक आहेत, ते स्पष्ट होणार आहे.










