अहमदनगर - येथील अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालय, रेल्वेस्टेशन येथील विद्यालयात शैक्षणिक वर्ष सन 2013 - 14 मार्च 2014 ला इ.10...
अहमदनगर - येथील अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालय, रेल्वेस्टेशन येथील विद्यालयात शैक्षणिक वर्ष सन 2013 - 14 मार्च 2014 ला इ.10 वीच्या परीक्षेत विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवून प्रतिभा राजेंद्र साळवे ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली. तिला शिष्यवृत्ती पुरस्काराचा लाभ मिळण्यासाठी मुख्याध्यापक मोरे राजेश डी. यांनी प्रयत्न केल्याने समाज कल्याण कार्यालयाद्वारे राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार शिष्यवृत्ती रक्कम रु.5000/- चा धनादेश प्राप्त होऊ शकला. सदर रकमेचा धनादेश व पुष्पगुच्छ विधान परिषद सदस्य मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या शुभहस्ते विद्यार्थीनीस देण्यात आला.









