नगर - महाराष्ट्र शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने नाशिक बॉडी बिल्डींग अॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या सहकार्याने शनिवार दि. 5 मार्च 2016 रो...

नगर - महाराष्ट्र शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने नाशिक बॉडी बिल्डींग अॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या सहकार्याने शनिवार दि. 5 मार्च 2016 रोजी, ओझरचे सरपंच हेमंत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सायं. 6 वा. भगवा चौक, ओझर, जि.नाशिक येथे 'ओझर श्री 2016' या उत्तर महाराष्ट्र श्री स्पर्धेचे रोख बक्षिसांच्या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ही स्पर्धा एकूण सहा वजनी गटात 55, 60, 65, 70 व 75 किलोवरील गटात घेण्यात येणार असून प्रत्येक वजनी गटात 1 ते 5 क्रमांक विजेत्यास अनुक्रमे रोख रुपये 3000, 2500, 1500 व 1000 देण्यात येणार आहे. किताब विजेत्यास रोख 21,000 रु., बेस्ट पोझर रोख 3000 रु. व मोस्ट इंम्प्रुव्हड बॉडी बिल्डरला रोख रु. 2000 आकर्षक ट्रॉफी, सर्टिफिकेट व मानाचा बेल्ट देऊन गौरविण्यात येणार आहे. गटातील प्रत्येक विजेत्यास हेल्थ अॅण्ड मोरचे संचालक धनंजय काळे यांच्या वतीने बॉक्सर कंपनीचे जीम कीट देण्यात येईल.









