नगर - पदव्युत्तर अभियांत्रिकी (गेट) परीक्षेत सावेडी, नगर येथील शुभम अविनाश जाधव याने धातुशास्त्र व पदार्थ विज्ञान विषयात देशात दहावा ...
नगर - पदव्युत्तर अभियांत्रिकी (गेट) परीक्षेत सावेडी, नगर येथील शुभम अविनाश जाधव याने धातुशास्त्र व पदार्थ विज्ञान विषयात देशात दहावा क्रमांक पटकावला. ही परीक्षा इंडियन इन्सिट्यूट ऑफ सायन्स मार्फत घेण्यात येते. या परीक्षेला तीस हजार विद्यार्थी बसले होते. शुभम जाधव हा पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विदयार्थी आहे. शुभम जाधव हा जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर कार्य़ालयातील श्री.अविनाश जाधव यांचे चिरंजीव होते. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.










