नगर - आमदार म्हणून नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर व अन्यायांवर आवाज उठविणारा कार्यकर्ता, जनतेचा सेवक म्हणून गेल्या 25 वर...
नगर - आमदार म्हणून नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर व अन्यायांवर आवाज उठविणारा कार्यकर्ता, जनतेचा सेवक म्हणून गेल्या 25 वर्षापासून नगरची जनता अनिलभैय्यांच्या मागे आजही तितक्याच विश्वासाने उभी आहे. केवळ 1 पराभव झाला म्हणून त्यांचे अस्तित्व संपले नाही आणि असा समजही कोणी करुन घेऊ नका असे प्रतिपादन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष भिमराज आव्हाड यांनी केले.
माजी मंत्री व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आव्हाड मित्र मंळाने त्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले भैय्या नगरची सर्वसामान्य जन ता आजही तुमच्या मागेच आहे. नव्या उमेदीने तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवल्याने आजही तेवढीच लोकप्रियता तुमची आहे. जेवढी 25 वर्षापासून होती. केवळ 1 पराभव झाला म्हणून तुमचे विरोधक अस्तित्व संपले असा गैरसमज करुन घेत आहेत. ते चूकीचे आहे. कार्यकर्त्यांचे बळ व जनतेची साथ तुम्हाला सदैव राहिल असे आव्हाड यावेळी म्हणाले.










