नगर - केवळ पंजाबी समाजापुरते सीमीत न राहता प्रत्येक जाती-धर्मासाठी माणुसकीच्या नात्याने समिती काम करत आहे. स्थापनेपासूनच नगर शहरा...
नगर - केवळ पंजाबी समाजापुरते सीमीत न राहता प्रत्येक जाती-धर्मासाठी माणुसकीच्या नात्याने समिती काम करत आहे. स्थापनेपासूनच नगर शहरात पंजाबी सेवा समिती विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. अनेक ट्रस्ट नागरीक स्थापन करतात मात्र काम काहीच करत नाहीत. या उलट सर्व समाजाला एकत्र आणून प्रत्येक समाजासाठी काही ना काहीतरी करण्याची धडपड समितीच्या सदस्यांची असते. त्यामुळे पंजाबी सेवा समितीचे कार्य प्रेरणादायी असून, इतरांनी त्यांचे अनुकरण करावे. समितीने मागणी केल्याप्रमाणे लवकरच नगर शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करुन देणार आहोत, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
पंजाबी सेवा समितीच्यावतीने राबविण्यात येणार्या सामाजिक उपक्रमांतर्गत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित मोफत सर्वरोग तपासणी व उपचार शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी आ.जगताप बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अभिषेक कळमकर होते. पुण्याच्या संचेती हॉस्पिटलच्या सहकार्याने झालेल्या या शिबीरामध्ये प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अजय कोठारी व त्यांच्या सहकार्यांनी 700 हून अधिक रुग्णांची यावेळी तपासणी केली. उद्घाटन सोहळ्यास गिरधारीलाल मध्यान, दामोदर बठेजा, नगरसेविक इंदरकौर गंभीर, पंजाबी समाजाचे अध्यक्ष गुलशन धुप्पड, मोहित पंजाबी आदि उपस्थित होते. यावेळी डॉ.हरमित कथुरिया, डॉ.रविंद्र सानप, डॉ.सतीश र्ेंाटके, डॉ.प्रमोद जगताप आदींनी शिबीरात सहभाग घेतला. यावेळी के.के. बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्याने झालेल्या नेत्रतपासणी शिबीरात 40 हून अधिक रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.









