डेहराडून - विदेशीमल्लांकडून फाइटमध्ये जखमी झालेल्या खलीने रविवारी "द ग्रेट खली रिटर्न्स मेगा शो" टायटल आपल्या नावे केले. डोक्य...
डेहराडून - विदेशीमल्लांकडून फाइटमध्ये जखमी झालेल्या खलीने रविवारी "द ग्रेट खली रिटर्न्स मेगा शो" टायटल आपल्या नावे केले. डोक्यावर टाके लागलेले असताना जखमी अवस्थेत खलीने दोन मिनिटांत कॅनडाच्या मल्लांना पराभूत केले. या फाइटच्या आधी खलीने वशेष पूजा केली होती. "२८ फेब्रुवारी रोजी विदेशी मल्लांना चोप देऊन मी हिशेब चुकता करेन. त्यांनी माझे डोके फोडले, आता मी त्यांचेही डोके फोडेन. "खुन का हिसाब खुन से लुंगा" असे खलीने दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. फाइटच्या वेळी खलीने ब्रॉडी स्टिल, मॅक्स आणि अपोलो या तिघांना एक दणक्यात धुतले. या तिघांना मारून-मारून खलीने चीत केले. खलीने तिघांना खुर्चीनेसुद्धा बदडून काढले. हल्दानी येथे झालेल्या पहिल्या फाइटमध्ये या तिघांनी खलीला लोखंडी खुर्चीने मारून जखमी केले होते. यानंतर खली आयसीयूत दाखल होता. त्याच्या डोक्यावर टाके लागले. त्याची प्रकृती बघता डॉक्टरांनी त्याला २८ फेब्रुवारीची फाइट न लढण्याचा सल्ला दिला होता. मात्र, खलीने
कोणत्याही परिस्थितीत लढण्याचा निर्णय घेतला. आयसीयूतून बाहेर आल्यानंतर खलीने ३५ अंडी, ५ किलो फळे, 7 ग्लास ज्यूस आणि 6 बर्गरचा नाष्टा केला होता.
खलीच्या फाइटनंतर मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने टि्वटर फोटो शेअर करताना लिहिले की, "बऱ्याच नाट्यमय घडामोडी, टि्वस्ट आणि वळणांनंतर अखेर हीरो विजयी ठरला.










