नगर - गेल्या दीड वर्षात शिक्षक मंत्र्यांनी शिक्षक शिक्षकेतर यांच्या प्रश्नांबाबत काहिही धोरणात्मक निर्णय न घेतल्याने महाराष्ट्र राज्...
नगर - गेल्या दीड वर्षात शिक्षक मंत्र्यांनी शिक्षक शिक्षकेतर यांच्या प्रश्नांबाबत काहिही धोरणात्मक निर्णय न घेतल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवार दि. 14 मार्च 2016 पासून शिक्षण क्षेत्रातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक संस्थेच्या प्रलंबित ज्वलंत मागण्यांकरीता अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत, आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत साखळी उपोषण आय़ोजित केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे महाराष्ट्र प्रांताचे कार्यालयीन मंत्री सुनिल पंडीत यांनी सांगितले.
या साखळी उपोषणास नाशिक विभाग शिक्षक परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी बेमुदत साखळी उपोषणासाठी मंगळवार दि. 15 मार्च 2016 रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रा.सुनिल पंडित, बाबासाहेब बोडखे, अनिल आचार्य, सुनिल सुसरे, विठ्ठल ढगे, सुधिर आपटे, विनायक साळवे, सौ.धात्रक आर.व्ही.सौ.सुलभा कुलकर्णी, सुरकुटला, पी.एच.चंद्रकांत चौघुले, सखाराम गारुडकर, बाबासाहेब बोरुडे, प्रा.म्हस्के प्रशांत, जी.एम.गाडीलकर, सौ.बुरा आर.आर., सौ.गिता गिल्डा, सौ.शोभा कुलकर्णी, आदिंनी केले आहे.










