मोफत संगणक शिक्षण पारनेर : शहरातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक शिक्षण देण्यात येणार असल्याचे राहुल मोरे यांनी सांगितले. प्...
मोफत संगणक शिक्षण
पारनेर : शहरातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक शिक्षण देण्यात येणार असल्याचे राहुल मोरे यांनी सांगितले. प्राचार्य शिवाजीराव देवढे, कैलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविणार असून महिनाभर मोफत संगणक शिक्षक देणार आहे, असे ते म्हणाले.
संजय गुंड यांची निवड
पारनेर : येथील वकील संजय गुंड यांची पारनेर पंचायत समितीवर कायदेशीर सल्लागार म्हणून निवड झाली. पंचायत समितीत विविध कायदेशीर बाबींवर ते काम पाहणार आहेत.
टाकळीखातगावात जलदिन
भाळवणी : टाकळीखातगाव शाळेत जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. हनुमान कनिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान शाखा प्रमुख प्रा. केशव चेमटे यांनी पाण्याचे महत्व विषद केले. यावेळी प्राचार्य एस.पी. कुलट, उपप्राचार्य वसंतराव भोर, पर्यवेक्षक सुभाष नरवडे, प्रा.संजय दुधाडे, प्रा.मच्छिंद्र साबळे उपस्थित होते.
तालुकाध्यक्षपदी कोरडे
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील हिवरे कोर्डा येथील रहिवासी सुदाम कोरडे यांची संभाजी ब्रिगेडच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
इतर पदाधिकारी : कोषाध्यक्ष- किसन धुमाळ, उपाध्यक्ष- प्रशांत औटी, जिल्हा सचिव- प्रवीण भोर. या निवडीप्रसंगी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कर्डिले हजर होते.










