भिंगारमधील काळे मॅथ्स व सायन्स अॅकॅडमीमध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी यंदाच्या शैक्षणि...
भिंगारमधील काळे मॅथ्स व सायन्स अॅकॅडमीमध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा अॅकॅमीतर्फे दिला जाणारा बालवैज्ञानिक पुरस्कार चि.आशिष राऊत आणि कु.प्रतिक्षा लबडे यांना प्रदान कऱण्यात आला.
आशिष राऊत या विद्यार्थ्याने तयार केलेले सोलर एरीगेशन सिस्टीम हे उपकरण आणि प्रतिक्षा या विदयार्थीनीने तयार केलेल पारकल ट्राएंगल हे गणिताचे उपकरण अशा दोनही उपकरणांना तालुका स्तरावर 98 शाळा आणि पाचशे विद्यार्थ्यांमधून प्रथम पारितोषिक मिळाले. अॅकॅडमीचे संचालक प्रा.सचिन काळे यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.










