२९ डिसेंबर रोजी या समितीचा अहवाल राज्य शासनास प्राप्त झाला आहे. त्यामध्ये समितीने एकूण ११ शिफारशी केलेल्या आहेत. त्यामध्ये राहुरीच्या ...
२९ डिसेंबर रोजी या समितीचा अहवाल राज्य शासनास प्राप्त झाला आहे. त्यामध्ये समितीने एकूण ११ शिफारशी केलेल्या आहेत. त्यामध्ये राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे विभाजन करण्यात येऊन जे नवे विद्यापीठ स्थापन करायचे आहे, त्या संदर्भातला निर्णय राज्य मंत्रिमंडळ घेईल, अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. चंद्रकांत रघुवंशी यांनी धुळे जिल्ह्यात स्थापन करावयाच्या प्रस्तावीत कृषी विद्यापीठाच्या संदर्भातील प्रश्न अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना खडसे म्हणाले, परभणी विद्यापीठाचे कुलगुरू व्यंकटेश वरल्लु यांची समिती नव्या विद्यापीठासंदर्भात स्थापन केली होती. प्रस्तावित विद्यापीठ धुळे किंवा जळगाव पैकी एका ठिकाणी करावे, असे समितीने म्हटले आहे. याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल, असे खडसे यांनी सांगितले.










