वीरगाव, कोकणगाव येथील घटना : दोन जनावरे दगावली मोबाईलवर बोलत असताना कोसळली वीज गणोरे: वीरगाव (ता. अकोले) येथील तरूण शेतकरी शामरा...
वीरगाव, कोकणगाव येथील घटना : दोन जनावरे दगावली
मोबाईलवर बोलत असताना कोसळली वीज
वाकचौरे यांच्यामागे वृद्ध आई-वडील व दोन मुली आहेत. एकुलता एक कमवता मुलगा गेल्याने वाकचौरे कुटुंबावर जणू आभाळच कोसळले आहे. गावावरही शोककळा पसरली आहे. ते मोबाईवर बोलत असल्याने त्यांच्याकडे वीज लवकर आकर्षित झाली असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
वादळी वाऱ्यासह रविवारी झालेल्या पावसात कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथील सात वर्षीय स्नेहल लालासाहेब चौरे हिचा मृत्यू झाला. या घटनेला चोवीस तास उलटले नाहीत तोच अकोले तालुक्यात वीरगाव येथील श्यामराव चंद्रभान वाकचौरे (वय ३२) यांचा सोमवारी वीज पडून मृत्यू झाला. पारनेर तालुक्यातील मौजे भांडगाव येथे वीज पडून बैलाचा मृत्यू झाला तर मौजे जामगाव येथे वीज पडून गाय दगावली.
अकोले तालुक्यात सोमवारी दुपारी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर वातावरणात कमालीचा उकाडा होता. विजांच्या कडकडाटासह नगर शहरात सातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. केडगाव उपनगरात कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वातावरणात गारवा वाढला असून, उकाडा सायंकाळनंतर कमी झाला. नगर तालुक्यासह काही तालुक्यांत पावसाचा शिडकावा झाला. काही ठिकाणी जोराचा पाऊस झाल्याने कांदा, ज्वारी आणि मका पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने मागील वर्षी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात हजेरी लावली होती. पण, जूनमध्ये अत्यल्प पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली. त्यामुळे खरीप पूर्णपणे वाया गेला असून, रब्बीचीही तीच अवस्था झाली. यंदा पुन्हा मार्चपूर्वीच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांतून चिंता व्यक्त होत आहे.










