सरकारच्या खुलाशाने गोंधळात भर : आता म्हणे कर सरसकट सर्वांना नाही नवी दिल्ली : नोकरदारांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत (प्रॉव्...
सरकारच्या खुलाशाने गोंधळात भर : आता म्हणे कर सरसकट सर्वांना नाही
नवी दिल्ली : नोकरदारांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत (प्रॉव्हिडन्ट फंड) जमा होणारी रक्कम काढून घेतल्यास त्यापैकी ६0 टक्के रकमेवर प्राप्तिकर आकारण्याच्या वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पातील प्रस्तावावर सडकून टीका झाल्यानंतर स्पष्टीकरण करण्याच्या नावाखाली सरकारने चक्क घूमजाव केले. महसूल सचिव हसमुख अढिया यांनी सकाळी केलेल्या खुलाशाने गोंधळात भर पडली. मात्र, दुपारनंतर वित्त मंत्रालयाने जे अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले त्यावरून हा कर सरसकट सर्वांना लागू होणार नाही व प्रॉव्हिडंट फंडातून काढलेली रक्कम पेन्शन फंडात गुंतविली तर कोणालाच हा कर भरावा लागणार नाही, असे चित्र स्पष्ट झाले.
प्रत्येक नागरिकास म्हातारपणी पेन्शनची सोय व्हावी यासाठी विविध पेन्शन फंडांना समान वागणूक देण्याच्या उद्देशाने वित्तमंत्री जेटली यांनी प्रॉव्हिडंट फंडातून काढलेल्या रकमेवर प्राप्तिकर आकारण्याचा प्रस्ताव केला. भाषणात त्यांनी याविषयी केलेला उल्लेख अगदीच त्रोटक होता. त्यांनी म्हटले की, राष्ट्रीय पेन्शन स्कीममधून (एनपीएस) नवृत्तीच्या वेळी काढल्या जाणार्या रकमेपैकी ४0 टक्क्यांपर्यंतची रक्कम करमुक्त करण्याचा (म्हणजेच राहिलेल्या ६0 टक्के रकमेवर प्राप्तिकर आकारण्याचा) माझा प्रस्ताव आहे. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसह (ईपीएप) इतरही सुपरअँन्युएशन फंडांमध्ये व मान्यताप्राप्त प्रॉव्हिडंट फंडांमध्ये १ एप्रिल २0१६ नंतर जमा केलेल्या रकमेलाही काढून घेताना ४0 टक्के हिश्श्यावर करआकारणीचा तोच निकष लागू होईल. हा कर नेमका कोणाला लागू होईल खासगी क्षेत्रात नोकरी करणार्यांनी नवृत्तीनंतर प्रॉ. फंडात जमा असलेली सर्व रक्कम काढून न घेता त्याऐवजी ती रक्कम अँन्युईटी योजनांमध्ये गुंतवून पेन्शनची सोय करावी हा या कर सुधारणेमागचा मुख्य उद्देश आहे.
यासाठी अर्थसंकल्पात असा प्रस्ताव केला गेला की, मान्यताप्राप्त प्रॉ. फंड व एनपीएसमधून नवृत्तीच्या वेळी काढून घेतल्या जाणार्या रकमेपैकी ४0 टक्के हिश्श्यावर प्राप्तिकर लागेल. राहिलेली ६0 टक्के रक्कमही अँन्युईटी योजनांमध्ये गुंतविली तर त्यावरही कर लागणार नसल्याने कर्मचारी कर भरण्याऐवजी अँन्युईटी घेऊन पेन्शनची सोय करतील अशी यामागची अपेक्षा आहे.










