श्रीगोंदा - तालुक्यातील ढवळगांव येथे भरदिवसा म्हणजेच 1 वाजण्याच्या सुमारास राजमाता जिजाई पतसंस्थेतून तब्बल साडेबारा लाख रुपये लुटण्य...
श्रीगोंदा - तालुक्यातील ढवळगांव येथे भरदिवसा म्हणजेच 1 वाजण्याच्या सुमारास राजमाता जिजाई पतसंस्थेतून तब्बल साडेबारा लाख रुपये लुटण्याची घटना घडली.
अधिक माहिती अशी की तालुक्यातील ढवळगांव याठिकाणी राजमाता जिजाई पतसंस्था आहे. या संस्थेत एक रोकड अधिकारी (कॅशीयर), एक मॅनेजर व एक कारकून असे तीन कर्मचारी कार्यरत आहे. आज शुक्रवार दुपारी साडेबारा ते पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास मॅनेजर व कारकून बाहेर गेले असतांना अचानक दोन अज्ञात इसमांनी शाखेत प्रवेश करुन कॅशीअरच्या तोंडावर स्प्रे मारुन बेशुध्द पाडले. ते बेशुध्द पडताच त्यांच्याजवळील ड्रॉवरमध्ये असलेले शाखेतील तब्बल साडेबारा लाख रुपयांची रक्कम या दोन अज्ञातांनी लांबवली आहे. याबाबतची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पो.नि.सचिन वांडगे घटनास्थळी दाखल झाले तर नंतर पो.उप. अधि. विजय लगडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.










