आजी-आजोबांसाठी नातवंडांनी केलेला कार्यक्रम कौतुकास्पद-अरविंद पारगांवकर नगर - सिंध एज्युकेशन सोसायटीच्या तारकपुर येथील सेंट विवे...
आजी-आजोबांसाठी नातवंडांनी केलेला कार्यक्रम कौतुकास्पद-अरविंद पारगांवकर
नगर - सिंध एज्युकेशन सोसायटीच्या तारकपुर येथील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आजी-आजोबांचा दिवस म्हणून या कार्यक्रमात शाळेतील मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, छोट्या नाटिका, नृत्य सादर करुन आजी-आजोबांप्रति आदर व प्रेम व्यक्त करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. मराठा कॉमर्स ऑफ चेंबरचे अध्यक्ष अरविंद पारगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.मधुसूदन मुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा अनोखा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी सिंधी एज्युकेशन सोसायटीची अध्यक्ष गिरधारीलाल मध्यान, सचिव दामोदर बठेजा, सदस्य रुपचंद मोटवानी, प्राचार्या गिता तांबे, उपप्राचार्या कांचन पापडेजा, मुख्याध्यापिका गोदावरी किरतानी आदिंसह आजी-आजोबा व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.










