नगर- काटवन खंडोबा येथे म.फुले वसाहतीतील घरे लोकापर्ण कार्यक्रमात कचरा वेचकांचे प्रमुख माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांच्या मागणी...
नगर- काटवन खंडोबा येथे म.फुले वसाहतीतील घरे लोकापर्ण कार्यक्रमात कचरा वेचकांचे प्रमुख माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांच्या मागणी वरुन नगर शहरातल्या 50 कचरा वेचक महिलांना मनपाचे ओळखपत्र खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.
सन 2002 पासूनची ही मागणी होती मध्यंतरी नगर पालिका असतांना 250 कचरा वेचकांना तत्कालीन मुख्याधिकारी यांनी नगर पालिकेचे अधिकृत ओळखपत्र दिले होते. आता महापालिके सहाशे पन्नास कचरा वेचकांपैकी 50 जणांचा ओळखपत्र देण्याच्या यादीत समावेश केला आहे. उर्वरितांनाही त्वरीत ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी उडाशिवे यांनी केली आहे.
शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न कचरा वेचक करत असतात. दररोज रस्त्यातील सुका कचरा त्या गोळा करतात त्यांना मानधन, पगार मिळत नाही. सुकाकचर्यांतील प्लॉस्टीक, लोखंड, कागद, पृष्ठा विकून त्यावर उदारनिर्वाह करतात पण त्यांच्या या कामामुळे शहर स्वच्छ होण्यास मदत होते, असे यावेळी सांगण्यात आले.










