नगर- शिवजयंतीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील निराधार महिला व गरीब मुलांकरीता काम करण्यासाठी श्रीमंत योगी फौंडेशनची स्थापन करण्यात आली आहे, ...
नगर- शिवजयंतीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील निराधार महिला व गरीब मुलांकरीता काम करण्यासाठी श्रीमंत योगी फौंडेशनची स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती फौंडेशनचे संस्थापक चेअरमन आबासाहेब गुंड यांनी दिली. यावेळी व्हाईस चेअरमन विक्रम शेळके, सचिव काशिनाथ जाधव, संचालक अतुल शिंदे, प्रथमेश ढेरे, अभिषेक घोलप, महेश ढजाळ, शशांक कुलकर्णी, राहुल लांडे आदिंची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली.
फौंडेशनचे उद्दिष्ट सांगतांना श्री.गुंड म्हणाले, समाजामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात गरीब-श्रीमंत दरी आहे. दिवसेंदिवस गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत होवून ही दरी वाढतच आहे. त्यामुळे गरीब व निराधारांवर सातत्याने मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. त्यामुळेच या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी श्रीमंत योगी फौंडेशनची स्थापना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर अन्यायाविरद्ध लढा देऊन स्वराज्याची स्थापना केली. सर्वसामान्य रयतेच्या न्याय व हक्कासाठी महाराज लढले. त्यांच्या स्वराज्यात कधीही कोणावरही अन्याय झाला नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्याच्या जयंतीचे औचित्य साधून श्रीमंत योगी फौंडेशनची स्थापना केली आहे. या फौंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक योजना राबविण्यात येणार आहेत. निराधार महिला योजना, श्रीमंत योगी चिल्ड्रन सेंटर, गरीब विद्यार्थी दत्तक योजना आदिंसह विविध सामाजिक उपक्रमांवर संपूर्ण जिल्ह्यात भर दिला जाणार आहे.










