नगर - केंद्रीय अर्थसंकल्पात सराफ व्यवसायावर लादलेला एक टक्का अबकारी कर रद्द करावा, या मागणीसाठी मार्चपासून जिल्ह्यातील दोन हजारांहू...
नगर - केंद्रीय अर्थसंकल्पात सराफ व्यवसायावर लादलेला एक टक्का अबकारी कर रद्द करावा, या मागणीसाठी मार्चपासून जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक सराफ व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. वीस दिवसांनंतर रविवारी सराफ व्यावसायिकांनी आपला बंद मागे घेतला असून शहरातील सराफ बाजार पूर्ववत सुरू झाला आहे.
केंद्राने सराफ व्यवसायावर लावण्यात आलेला एक टक्का अबकारी कर रद्द करावा, या मागणीसाठी नगर शहर जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांनी मार्चपासून आपली दुकाने बंद ठेवून आंदोलन सुरू केले होते. या बंदचा फटका व्यावासायिकांबरोबरच सुवर्ण कारागीर ग्राहकांनाही बसला. गेल्या वीस दिवसांपासून सराफ बाजार बंद असल्यामुळे बाजारातील ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल ठप्प झाली होती. कर रद्द करण्यासाठी सराफ व्यावसायिकांनी पुणे दिल्लीत मोर्चा काढला होता. येथील जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला होता. रविवारी हा बंद मागे घेण्याचा निर्णय सराफ व्यावसायिकांनी घेतला. दुपारपासून नगर शहरातील सराफ बाजारातील दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. वीस दिवस सराफ बाजारात शुकशुकाट होता. रविवारी संध्याकाळी सोन्या-चांदीचा बाजार पुन्हा गजबजला.










