नगर- समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत आरोग्याची सेवा आनंदऋषीजी हॉस्पिटल पोहचवत आहे. रुग्णांना त्याच्या व्याधीवर उपचार करण्यासाठी पैसा हा ...
नगर- समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत आरोग्याची सेवा आनंदऋषीजी हॉस्पिटल पोहचवत आहे. रुग्णांना त्याच्या व्याधीवर उपचार करण्यासाठी पैसा हा अडसर न ठरता दानशूर समाजाप्रती काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने आनंदऋषीजी हॉस्पिटल दीन-दुबळ्यांची नि:स्वार्थपणे सेवा करीत आहे. हेे कार्य समाजाप्रती दिपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन, समाजरत्न हस्तीमल मुनोत यांनी केले.
आचार्य श्री आनंदऋषीजी यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त लायन्स क्लब ऑफ सेवायात्री तर्फे आयोजित व श्री.चांदमल मुनोत पब्लिक ट्रस्टतर्फे प्रायोजित आयुर्वेद तपासणी शिबीराचे दिपप्रज्वलनाने उद्घाटन हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष सुभाष बायड, संचालक आनंदराम मुनोत, किशोर मुनोत, सौ.सुजाता मुनोत, व्हीआरडीईचे डायरेक्टर मुकुंद त्रिकांडे, रामनाथ वायकर, कृपाल आश्रमचे अध्यक्ष श्यामलाल छाबरीया, उपाध्यक्ष श्यामलाल कोकरेजा, संचालक शिवकुमार छाबरीया, श्रीराम भावनाणी, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.रुपेश बोरा, डॉ.अमित पाटील, डॉ.अशोक शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
या शिबीरात एकूण 225 रुग्णांची तपासणी करण्यात आली. मंगळवार दि. 29 मार्च रोजी दंत तपासणी व उपचार शिबीर होणार असून, डॉ.सौ. मंजुषा गांधी व डॉ.श्रीकांत सायंबर रुग्णांची तपासणी करणार आहेत.









