नगर- येथील हेमराज केटरिंगचे संचालक हेमराज बोरा व औरंगाबाद येथील अॅड.संतोष बोरा यांच्या मातोश्री श्रीमती पानकंवरबाई चंपालालजी बोरा या...
नगर- येथील हेमराज केटरिंगचे संचालक हेमराज बोरा व औरंगाबाद येथील अॅड.संतोष बोरा यांच्या मातोश्री श्रीमती पानकंवरबाई चंपालालजी बोरा यांचे आज दि. 17 मार्च रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्यांनी सामाजिक, अध्यात्मिक व धार्मिक कार्याचा वारसा आयुष्यभर जपला.
अमरधाम येथे स.11 वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांचा उठावणा शुक्रवार दि. 18 मार्च रोजी दु. 3 वा. धार्मिक परिक्षा बोर्ड येथे होणार आहे.









