नगर - नगर जिल्हा ही साधू-संतांची भुमी म्हणून देशात प्रसिद्ध आहे. संतांच्या उत्सवांमुळे देशात राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळते, असे प्रतिपा...
अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ, मराठा सेवा संघ, मखदूम सोसायटीच्यावतीने दर्गादायरा येथील शाह बाबांच्या उत्सवानिमित्त समाधीस चादर अर्पण करण्यात आली. यावेळी कॉ.बहिरनाथ वाकळे, इंजि.अभिजित वाघ, आर्सिें दुलेखान, राजूभाई शेख, इंजि.अनिस शेख, शाकिर मामू, अमानभैय्या, आबीद खान, सचिन डागा, शाह साहब, दत्ता वडवणीकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना कॉ.वाकळे म्हणाले, आपल्या इतिहासाला सुद्धा शाह बाबांचे खूप महत्व आहे. अहमदनगरमधील दर्गा दायरा या बुर्हाणनगर भागातील संत शाह यांचा दर्गा आहे. मालोजी राजांना जे दोन पूत्र झाली, त्यांची नावे एकाचे शहाजी तर दुसर्याचे शरीफ याच संतांच्या नावावरुन ठेवले गेले. शहाजी महाराज हे छत्रपती शिवारायांचे वडिल होत. या दर्ग्याचे बांधकाम मालोजी राजेंनी स्वत: करुन घेतले. भोसले कुटूंबीयांचे या संतांवर अपरंपार श्रद्धा होती. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाजनांनी याच दर्ग्यावर येवून नवस केले होते, तो पूर्ण झाल्यावर आज देखील त्यांचे पूर्वजांसह आजचे वंशज देखील शहा शरीफ बाबांच्या जयंती उत्सवात येवून डोके टेकवतात, अशा या इतिहासात बाबांचा दर्गा गणला जातो. अशा स्मृतीस्थळांचा विसर आपल्याला पडता कामा नगर जिल्ह्यात सर्व धर्मियांच्या साधू-संतांची महती आहे. त्यांचा इतिहास आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. पुढील पिढीला हा इतिहास समजला तरच राष्ट्रीय एकात्मतेचे आपले स्वप्न पूर्ण होईल, असे ते म्हणाले.नगर शहराच्या स्थापनेला 525 वर्षे पूर्ण झाली. शहरातील असंख्य धार्मिक, ऐतिहासिक स्थळे आजही पूर्वीप्रमाणेच आहे, त्यांची निगा आपण ठेवणे कर्तव्य समजून या पुरातन स्थळांची देखभाल करण्याची खरी गरज आहे.









