नगर - शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टचे सचिव अशोक माधवराव कानडे यांची नुकतीच स्थानिक रेल्वे सल्लागार समितीवर निवड क...
नगर - शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टचे सचिव अशोक माधवराव कानडे यांची नुकतीच स्थानिक रेल्वे सल्लागार समितीवर निवड कऱण्यात आली आहे. सोलापूरमध्ये रेल्वेचे वाणिज्य प्रबंधक अशोककुमार उपाध्याय यांनी कानडे यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले आहे.
कानडे हे गेल्या 8 वर्षापासून रेल्वे समितीवर सदस्य म्हणून काम पाहत आहेत. प्रवाशांच्या अडी-अडचणी, नवीन रल्वे सुरु करण्याबाबत, लांब पल्ल्याच्या गाड्यांना नगरला थांबा मिळण्याबातच्या अनेक प्रश्नांवर ते सतत पाठपुरावा करीत असतात. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे अनेक प्रवासांच्या सोयीच्या अनेक मागण्या मान्यही झाल्या आहेत. रल्वे संदर्भात काही सूचना असल्यास प्रवाशांनी आपल्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.कानडे हे शहर सहकारी बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक तसेच हिंद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









