हिवरेबाजार येथे आयोजित कृषी व जल परिसंवादात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.के.पी. विश्वनाथा बाजार येथे शुद्ध विषमुक्त कृषी उत्पन्न तया...
हिवरेबाजार येथे आयोजित कृषी व जल परिसंवादात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.के.पी. विश्वनाथा बाजार येथे शुद्ध विषमुक्त कृषी उत्पन्न तयार करण्यात येणार असून, यासाठी शेतकऱ्यांच्या १५ बचत गटांची स्थापना करून कृषी कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून दूध, तूप, दही, लस्सी, आम्रखंड, श्रीखंड, मूग डाळ, हरभरा डाळ, जवस चटणी यासह विविध पदार्थ तयार करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
हिवरेबाजार येथे ग्रामस्थांना बरोबर घेऊन केलेल्या दिशादर्शक कामातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य झाला असून, येथील हरितक्रांती देशातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी असल्याचे मत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी व्यक्त केले.
हिवरेबाजार येथे शनिवारी आयोजित कृषी व जल परिसंवादात ते बोलत होते. विश्वनाथा म्हणाले, कृषी विद्यापीठात कृषिशास्त्र असणार्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. हिवरेबाजार येथे मात्र, प्रत्यक्ष कृतीतून हरितक्रांती घडवून आली आहे. देशातील टंचाईग्रस्त गावांनी हिवरेबाजाराचा आदर्श घेऊन काम केले तर परिस्थती बदलेल यात शंका नाही. कृषी विद्यापीठाकडे हजारो हेक्टर जमीन असून पाण्याचीही उपलब्धता आहे. त्या जमिनीवर हिवरेबाजार गावासारखाच प्रयोग राबविण्यात येणार आहे. राज्याच्या आदर्शगाव योजनेतील समाविष्ट गावांतील जलटंचाई दूर करण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठ सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे विश्वनाथा म्हणाले.










