केडगांव आणि परिसरातील चर्मकार समाजातर्फे दि.28 फेब्रु.2016 रोजी संत रोहिदास महाराज जयंती उत्सवाचे आयोजन कऱण्यात आले होते. या कार्यक...
केडगांव आणि परिसरातील चर्मकार समाजातर्फे दि.28 फेब्रु.2016 रोजी संत रोहिदास महाराज जयंती उत्सवाचे आयोजन कऱण्यात आले होते. या कार्यक्रमास मा.आमदार संग्राम भैय्या जगताप, मा.महापौर अभिषेक कळमकर, मा.उपमहापौर संग्रामभैय्या जगताप, मा.महापौर अभिषेक कळमकर, मा.उपमहापौर सुवर्णाताई कोतकर, नगरसेवक सुनीलमामा कोतकर, अध्यक्ष सिताराम वाघ, रोहिदास महाराज मित्रमंडळ, शाहूनगर, केडगांव तसेच सदस्य रामदास सातपूते, एस.बी.वेताळ, ए.एम.केदार, एम.एस.साळवे, एम.पी.धस, एस.व्ही.रोहोकले, शिवाजी अभिनव इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रा.संजय वाघमारेही उपस्थित होते. यावेळी तत्वज्ञान विभागप्रमुख न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथील प्रा.अमन बगाडे यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानात त्यांनी संत रोहिदास महाराजांचे जीवनचरित्र व तत्वज्ञान याचा त्यांनी आढावा घेतला.
प्रा.अमन बगाडे म्हणाले की, संत रोहिदासांनी आपल्या आयुष्यात अतोनात हालअपेष्टा सोसून रुरामानंदांकडून वेद, शास्त्रे व उपनिषदीय तत्वज्ञान प्राप्त करुन ते सर्व बांधवांना त्यांनी आपल्या सहज, सुलभ आणि रसाळवाणीने दिले. रोहिदासांचे तत्वज्ञान उच्चविचारी, मानवतावादी होते. त्यांनी कधीही आपल्या कामाची लाज बाळगली नाही.










