नगर - दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या कै.वि.ल.कुलकर्णी प्राथ. शाळेतील 1 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला कलाकृती व टाकाऊपा...
नगर - दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या कै.वि.ल.कुलकर्णी प्राथ. शाळेतील 1 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला कलाकृती व टाकाऊपासून टिकाऊ वस्तू यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिध्द चित्रकार व शिल्पकार प्रमोदजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कला माणसाचे जीवन समृध्द बनवते आणि त्यातल्या त्यात लहान मुलांच्या भावनांचे प्रकटीकरण मुलांच्या कलाकृतीतून उमटते असे ते यावेळी बोलतांना म्हणाले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. वाल्मिक कुलकर्णी, उपाध्यक्ष द.पु.पाटील, सेक्रेटरी अॅड.अ.ना.मुळे, सहसेक्रेटरी रुणवाल साहेब, खजिनदार सौ.स्वाती नगरकर, ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य दि.ना.जोशी, श्रीमती रेखे मॅडम उपस्थित होते. या सर्व उपस्थितांनी मुलांच्या कलाकृतीचे कौतुक केले.










