नगर - श्रीराम कृषी विकास संस्था ही शेतकऱ्यांशी संलग्न काम करतांना सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्ष...
नगर - श्रीराम कृषी विकास संस्था ही शेतकऱ्यांशी संलग्न काम करतांना सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी 5 वी ते 7 वीच्या 15 विद्यार्थीनींना व 10 वीच्या 3 विद्यार्थिनींना श्रीराम कृषी विकास कार्य़क्रमांतर्गत 40 हजारांची शिष्यवृत्ती देण्यात आल्याचे बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले म्हणाले.
नगर तालुक्यातील वाकोडी येथे श्रीराम कृषी विकास कार्यक्रमांतर्गत 5 वी, 6 वी, 7 वी व 10 वीच्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रमेश इनामकर, प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर राठोड, संग्राम पवार, चंद्रशेखर थोरा, पोपट ढाकणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.










