नुकत्याच कल्याण-ठाणे येथे झालेल्या 55 व्या पुरुषगट महाराष्ट्र श्री 2016 व 4 थी महिला गट मिस महाराष्ट्र 2016 ह्या राज्य अजिंक्यपद शरीर...
नुकत्याच कल्याण-ठाणे येथे झालेल्या 55 व्या पुरुषगट महाराष्ट्र श्री 2016 व 4 थी महिला गट मिस महाराष्ट्र 2016 ह्या राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव व फिटनेस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अ.नगरचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते मधुकर गायकवाड, राष्ट्रीय पंच प्राचार्य़ जयंत गिते, मनोज गायकवाड, शब्बीर अन्सार सय्यद, मयुर दरंदले, कैलास रणसिंग, राहुल कुलकर्णी यांचा एशियन सेक्रेटरी डॉ.संजय मोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याणचे पश्चिमचे आमदार मा.श्री.नरेंद्र पठार, मा.राजेंद्र सातपुरकर, सरचिटणीस महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या हस्ते वरील सर्व मान्यवरांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.
यावेळी बोलतांना डॉ.संजय मोटे यांनी अ.नगर मधील राष्ट्रीय पंच यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठीचे उत्कृष्ट संयोजन व नियोजन केले. त्याचे गौरव उद्गार काढले व भविष्यात आपणाकडून अशीच उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा केली.










