नगर:- सर सय्यद खान हे 19 व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होते. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार कर...
नगर:- सर सय्यद खान हे 19 व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होते. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करुन त्यांचा समाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. त्यांनी मुस्लिमांना इंग्रजी भाषा शिकणे व त्यात शिक्षण घेण्याचे एक आवाहनात्मक कार्य केले होते. समाजामधून त्यांना यासाठी फार विरोध सहन करावा लागला तरी त्यांनी हार न मानता आपले कार्य सुरु ठेवले. सर सय्यद यांनी मोहमेडन ऍग्लो ओरिएन्टल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या मृत्यूनंतर 1920 मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला, असे प्रतिपादन इंजि.अनिस शेख यांनी केले.
मखदूम एज्यु.ऍण्ड वेलफेअर सोसा. तर्फे सर सय्यद अहेमद खान यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुकुंदनगर येथील दर्गा दायरा, जि.प.उर्दू प्राथमिक शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे उर्दू साहित्य परिषदेचे इंजि.अनिस शेख, शर्रेंुद्दीन शेख, नवेद मिर्झा, आबीद दुलेखान आदि मान्यवर उपस्थित होते.









