Archive Pages Design$type=blogging

घरगुती पाणीपट्टी जैसे थे मात्र औद्योगिक पाणीपट्टीत वाढ

अहमदनगर - महापालिकेने सादर केलेले घरगुती पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव महासभेने काल फेटाळून लावला असून त्यामुळे नागरिकांवरील घरगुती पाणीप...



अहमदनगर - महापालिकेने सादर केलेले घरगुती पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव महासभेने काल फेटाळून लावला असून त्यामुळे नागरिकांवरील घरगुती पाणीपट्टी वाढीचे संकट टळले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र व्यावसायिक व औद्योगिक पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव विरोधकांचा विरोध असतानाही मान्य करण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्यावर मात्र हा बोजा वाढला आहे.

यामध्ये आता अर्धा इंच व्यावसायिक पाणीपट्टी ५४00 रुपयांवरुन १0 हजार करण्यात आला आहे. तसेच पाऊण इंची १0८00 रुपयावरुन २0 हजार तर एक इंची पाणीपट्टी २२ हजारावरुन ४0 हजार रुपये करण्यात आली आहे तर औद्योगिक पाणीपट्ट्टी अर्धा इंचासाठी १0 हजार ८00 वरुन २0 हजार, पाऊण इंची २१ हजार ६00 वरुन ४0 हजार तर १ इंची ४३ हजार २00 वरुन ८0 हजार इतकी करण्यात आली आहे. तसेच अग्निशमन सेवेवर २ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव नामंजूर करीत फिरता दवाखाना, आरोग्य सुविधा निशुल्क करण्याच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे.

मंगळवार दि. २९ रोजी स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांनी मनापाचा अर्थसंकल्प सभेत सादर केला होता यावर काल बुधवार दि. ३0 रोजी मनपाच्या अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिठासीन अधिकारी तथा महापौर अभिषेक कळमकर, उपमहापौर सौ. सुवर्णाताई कोतकर, अति. आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहरे, नगरसचिव मिलिंद वैद्य, लेखाधिकारी हितेश विसपुते, लेखापरिक्षक श्रीकांत अनारसे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या सभेसही आयुक्त विलास ढगे अनुपस्थितच होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: घरगुती पाणीपट्टी जैसे थे मात्र औद्योगिक पाणीपट्टीत वाढ
घरगुती पाणीपट्टी जैसे थे मात्र औद्योगिक पाणीपट्टीत वाढ
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlxoZwkKEXY6v_6mj5RnVaNslSFPKXelnJ74vWNbXg2V1rIg_ya5hR3kvMCu837MUhg3eaZQVsHJ0wrHXhPYT7EFgxlU0pJQoQiPKHo2l2929cRMDVM0VZbW80dFGfPxd2LPoyj7am8gQq/s1600/panipatti.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlxoZwkKEXY6v_6mj5RnVaNslSFPKXelnJ74vWNbXg2V1rIg_ya5hR3kvMCu837MUhg3eaZQVsHJ0wrHXhPYT7EFgxlU0pJQoQiPKHo2l2929cRMDVM0VZbW80dFGfPxd2LPoyj7am8gQq/s72-c/panipatti.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_847.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_847.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago