नेवासा - आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोट्या केसेस करून सुडाचे राजकारण चालू केले आहे. मागी...
नेवासा - आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोट्या केसेस करून सुडाचे राजकारण चालू केले आहे. मागील काही महिन्यात जाहीरपणे विरोधकांना जेलमध्ये पाठविण्याची भाषा त्यांनी केली होती. हे आ.मुरकुटे यांचे हे निंदनीय कृत्य असल्याचा जाहीर आरोप मार्केट कमिटीचे अध्यक्ष कडुबाळ कर्डिले व उपाध्यक्ष वंसत चाचा देशमुख यांनी केला आहे.
नेवासा मार्केट कमिटीने ३0 वर्षापूर्वी कराराने मुनोत, कोठारी व साळुंके यांना भाडेतत्वावर जागा दिली होती. त्याची मुदत संपली होती. वरीलपैकी साळुंके वगळता दोघांनी जागा खाली करून नव्याने करार करण्याची तयारी दाखविली; परंतु साळुंके यांना वारंवार नोटीस देवूनही जागा करण्यास नकार दिला. पोलिसांना सुचना देवून पंचासहीत सकाळी त्यांच्या गोदामाला सिल केले.
मार्केट कमिटी ही जनतेची संस्था असून तीचा प्रामाणिकपणे संभाळ करणे ही आमच्या सर्व संचालकांची जबाबदारी आहे. हे सर्व असतानाही आ.मुरकुटे यांनी गोदाम सील करत असताना पोलिस संरक्षण येवू दिले नाही व शेतकर्यांची संस्था आम्ही जपत असताना आपल्या कार्यकर्त्यांचे फायदे व्हावे यासाठी मार्केट कमिटीचे नुकसान झाले तरी चालेल अशी लोकप्रतिनिधींची भूमिका होती. अवैध धंद्याचा सुळसुळाट चालू आहे. चोरीची वाळू खुलेआम उचलली जात आहे. जनसामान्य जनतेला पोलीस ठाण्यात न्याय मिळत नाही. याविषयी आ.मुरकुटे मुग गिळून गप्प बसले आहे हे त्यांचे वागणे दुर्दैवी आहे. आमच्या सारख्या अनेक सामान्य कार्यकर्त्यांवर सच्चा पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही चालू केली आहे.हे आम्ही कदापीही सहन करणार नसून यावर निश्चित आवाज उठविला जाईल असे कर्डिले व देशमुख यांनी सांगितले आहे.










