नगर - गेल्या वीस वर्षात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच कागारांच्या विविध समस्या अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सं...
नगर - गेल्या वीस वर्षात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच कागारांच्या विविध समस्या अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संत रोहिदास सेवाभावी संस्था आडगांव, ता.पाथर्डी, जि.अ.नगर यांच्या वतीने शिवाजीराव साळवे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला.
हा पुरस्कार त्यांना ह.भ.प.अर्जुन महाराज खाडे (आळंदी) यांच्या हस्ते दि.16 मार्च 2016 रोजी समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल माजी मंत्री बबनरावजी घोलप, आ.भाऊसाहेब कांबळे, आ.अरुणकाक जगताप, मा.आ.दादाभाऊ कळमकर, शंकरराव घुले, राजेंद्र बुंदेले, संजयची खामकर, सुभाष साळवे, निलेश बांगरे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.










