श्रीगोंदा - श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगांव येथील जिजाई पतसंस्थेच्या साडेबारा लाख रुपयांच्या लुटीतील खरा आरोपी हा त्याच पतसंस्थेत रोकड...
श्रीगोंदा - श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगांव येथील जिजाई पतसंस्थेच्या साडेबारा लाख रुपयांच्या लुटीतील खरा आरोपी हा त्याच पतसंस्थेत रोकड अधिकारी म्हणून काम करणारा भानुदास शिंदे निघाला. भानुदास शिंदे यांनी स्वतःच्याच तोंडावर स्प्रे मारुन बेशुध्द पडून रक्कम लुटल्याचा बनाव केला. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी रोडक अधिकाऱ्याचा खरा चेहला समोर आणून पर्दाफाश केला. संपूर्ण रकमेचा रोकड अधिकारी भानुदास शिंदेला केली अटक.
श्रीगोंदा तालुका हद्दीतील बेलवंडी शिरुर रस्त्यावर ढवळगांव येथे राजमाता जिजाई पतसंस्था आहे. या शाखेत दोन दिवसांपुर्वी दि. 18 मार्च 2016 रोजी मॅनेजर सुनिल जाधव व कारकून सुनिल मुळे हे दुपारी साडे बारा ते पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास संस्थेच्या बाहेर गेले असतांना दोन अज्ञातांनी प्रवेश करुन कॅशियर भानुदास शिंदे यांच्या तोंडावर स्पे मारुन त्यांना बेशुध्द करुन 12 लाख 12 हजार 990 रु. लांबवण्याची घटना घडल्याचे कॅशियर शिंदे यांनी सांगितले होते मात्र प्रत्यक्षात शिंदे यांनीच तसा बनाव केला होता. बेलवंडी पोलीसांनी तसा गुन्हाही दाखल केला होता .मात्र पोलीसांनी यामध्ये संशय आल्याने पोलीस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी, अ.पो.अधिक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पो.अ.विजय लगारे यांनी गुन्ह्याचा वेगळ्या प्रकारे तपास करुन संशयीत म्हणून वाटलेल्या कॅशिअरलाच ताब्यात घेतले व खरी घटना वदवून घेऊन त्यांच्याकडील 12 लाख 12 हजार 990 रुपयाची रक्कमही हस्तगत केली व खऱ्या गुन्हेगारास अटक करुन त्याच्यावर संस्थेची फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
सदरची संस्था पानोली ता.पारनेर जि.अहमदनगर या अंतर्गत चालते. या प्रकरणामुळे तालुक्यात देखील असे प्रकार घडू लागले आहेत असे वाटून खळबळ उडाली होती. मात्र दोन दिवसात घडलेला खरा प्रकार व खरा आरोपी उघड करुन शिंदे यांस अटक केल्याबद्दल पोलीसांचे कौतुक होत आहे.










