नगर - पद्मकन्या पुरस्कार समितीच्या वतीने पद्मशाली समाजातील कष्टकरी व कर्तृत्ववान महिलांना पद्मकन्या पुरस्कार जिल्हाधिकारी अनिल कवडे...
नगर - पद्मकन्या पुरस्कार समितीच्या वतीने पद्मशाली समाजातील कष्टकरी व कर्तृत्ववान महिलांना पद्मकन्या पुरस्कार जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी अनिल कवडे हे कुटुंबाला उध्वस्त करणारे आणि माणसाला मनोरुग्ण करणारे टी.एफ.डब्लू या तीन शत्रूंपासून कुटुंबाला वाचविण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.
पुरस्काराचे मानकरी मा.शोभा कोडम, सौ.सुशीला येमूल, सौ.शशिकला बोज्जा, सौ.पुष्पा बीमन, वंदना गड्डम, विजया न्यालपेल्ली, सौ.सुरेखा आडम, डॉ.रत्ना बल्लाळ, सुरेखा विद्ये, प्रिया आकेन या दहा महिलांना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते पद्मकन्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व पद्मशाली समाजाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून गोपिका बोरा, न्या.राजेंद्र शिवरात्री यांचा व समन्वय संघमचे संस्थापक श्रीकांत वंगारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
टी.एफ.डब्लू चे विश्लेषण करतांना अनिल कवडे म्हणाले की, टी.एफ.डब्लू म्हणजे टीव्ही, फेसबुक व वॉट्स अॅप हे तीन शत्रू आपल्या घरात घुसलेले आहे. त्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. नाहीतर कुटुंबाचे मानसिक संतुलन बिघडण्याची दाट शक्यता आहे. यापासून आपण आपल्या कुटुंबाचे रक्षण केले पाहिजे.
या कार्यक्रमासाठी तिरमलेश पासकंटी, अजयकुमार लयचेट्टी, देवेंद्र गड्डम, अमर बुरा, साईनाथ येनगंदूल, श्रीनिवास बुरगुल, राजेंद्र दासरी आदींनी परिश्रम घेतले. महिला महोत्सवाचे पहिले स्वागताध्यक्ष जितेंद्र वल्लाकट्टी यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्रकाश कोटा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.विठ्ठल बुलबुले यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम पासकंटी यांनी मानले.









