विनापरवाना पोस्टरबाजी करणाऱ्या पक्षांना सुनावले मुंबई - 'विनापरवानगीहोर्डिंग्ज बॅनर लावण्याचे निर्देश देऊनही राज्यभरात त्या...
विनापरवाना पोस्टरबाजी करणाऱ्या पक्षांना सुनावले
मुंबई - 'विनापरवानगीहोर्डिंग्ज बॅनर लावण्याचे निर्देश देऊनही राज्यभरात त्याचे पालन होत नाही. न्यायव्यवस्थेला थट्टा समजता का?,' असा सवाल करत उच्च न्यायालयाने बॅनरबाजी करणाऱ्या राजकीय पक्षांना गुरुवारी सुनावले. याप्रकरणी न्यायमूर्ती ए. एस. ओक आणि शालिनी फणसाळकर- जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले, गेल्या वर्षभरापासून आम्ही राजकीय पक्षांना निर्देश देऊन होर्डिंग्ज आणि बॅनरबाजी करण्याबाबत सांगत आहोत. मात्र, ९० टक्के राजकीय पक्षांना याची गरज वाटत नाही. राजकीय पक्षांनी आमची थट्टा चालवली आहे का?, अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले.
याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर म्हणाले, 'मराठी भाषा दिवसानिमित्त सर्वच राजकीय पक्षांनी शहरभर बॅनर लावले होते. काही दिवसांपूर्वी देवनार येथे अनधिकृत पोस्टर्स काढण्यासाठी गेलेल्या मनपाच्या अधिकाऱ्याला परिसरातील नागरिकांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यावर न्यायालय म्हणाले, अनधिकृत होर्डिंग्ज काढताना पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिस पथक देण्यात यावे. जेणेकरून असे हल्ले भविष्यात होणार नाहीत.'
"कैद्यांनाचांगले अन्न द्या'
कैद्यांनाचांगले अन्न स्वच्छ शौचालयाची सुविधा द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि रेवती मोहिते- ढेरे यांनी गुरुवारी राज्यातील सर्व तुरुंग अधीक्षकांना दिले. येरवडा तुरुंगातील कैदी शेख इब्राहिम अब्दुल याच्या याचिकेवर हे आदेश देण्यात आले. तुरुंगात स्वच्छ शौचालये नाहीत. तसेच चांगले अन्नही येथे मिळत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने पुणे न्यायदंडाधिकारी यांना तुरुंगाला भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.










